Hot Posts

6/recent/ticker-posts

Kunal Kamra controversy | 'त्या' वक्तव्याचा निषेध; वैजापुरात शिवसैनिक आक्रमक

तहसीलदारांना दिले निवेदन 


वैजापूर: शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Deputy Chief minister Eknath Shinde) यांच्याविरुद्ध कुणाल कामराने (Kunal kamra) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा येथील शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. 


माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप संजय बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेरखान  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी कामरा याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी कामरा याची छायाचित्रे फाडत निषेध नोंदवला. 

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्यावतीने तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय उपमुख्यमंत्री असून त्यांच्याविषयी जनतेमध्ये आदर आहे. अशा वक्तव्यामुळे जनमानसात कामरा याच्याविरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

 कामरा याने एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी असे वक्तव्य केले आहे. असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर डॉ. राजीव डोंगरे, खुशालसिंह राजपूत, राजेंद्र साळुंके, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, अमिर अली, डॉ. संतोष गंगवाल, संगीताताई बोरनारे , सुलभाताई भोपळे, सुप्रियाताई व्यवहारे, अबोलीताई बोरनारे, वर्षाताई बोरणारे  यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.