गोदावरीच्या तीरावर नियोजन
वैजापूर: गिनिज बुकात नोंद असलेल्या १७८ व्या योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यातील गोदावरीच्या तीरावर असलेल्या शनिदेवगाव,चेंडूफळ, बाजाठाण, हमरापूर, अव्वलगाव,भामाठाण, कमलपूर पंचक्रोशीत करण्याचे नियोजन आहे.यासाठी मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या समवेत भक्तमंडळाने स्थळ पाहणी सुरु केली आहे.
वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह सर्वात मोठा सप्ताह असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.हजारो वारकरी या महाकुंभासाठी हजर असतात रात्रंदिवस भजन कीर्तन सत्संग असे विविध कार्यक्रम पार पडतात. या सप्ताहाचे प्रमुख १० हजार टाळकरी एकाचवेळी भजन करतात. दररोज १५० ते २०० गावांतून भाकरी आणून दररोज लाखो भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो.
हा सप्ताह गोदाकाठावर व्हावा यासाठी गंगथडीच्या पंचक्रोशीतील भाविकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आम्हाला सप्ताह मिळावा. ही आग्रही मागणी असल्याने रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी शनिवारी (दि.१५) रोजी शनिदेवगाव येथील शनि मंदिरापासून तर बाजाठाण येथील आशुतोष महादेव मंदिरापर्यंत जागेच्या परिसराची पाहणी करण्यात आली.यावेळी रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे मंहत सदिपान महाराज, सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज, योगानंद महाराज, आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare), माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Former MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
'हेच' असेल ठिकाण
गोदावरीच्या काठी विविध पुरातन मंदिरे असून या स्थळपाहणीत महाराजांनी सप्ताह याच परिसरात करण्याचे सकारात्मक संकेत दिले. दोन्ही गावांतील मध्यवर्ती असलेले देवस्थान रामेश्वर महादेव मंदिर या परिसरात सप्ताहाचे मध्यवर्ती ठिकाण असेल. याच परिसरात भजन, कीर्तन, मंडप उभारण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आली. पूर्वतयारी म्हणून ही स्थळपाहणी करण्याण आली. असे महाराज म्हणाले.
Social Plugin