उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Former MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह १८ मार्च रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उबाठा शिवसेना सोडल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबत काम निर्णय घेतला होता. परंतु असे असले तरी त्यांनी जाहिररित्या पक्षात प्रवेश घेतला नव्हता. डॉ. दिनेश परदेशींच्या (Dr Dinesh Pardeshi) उबाठा प्रवेशानंतर चिकटगावकर नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकून बोरनारेंसोबत जाऊन निवडणुकीत काम केले.
त्यानंतर त्यांनी थोडी 'विश्रांती' घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare), रामदास कदम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकटगावकर यांच्यासह माजी जि.प.उपाध्यक्ष दिनकर पवार, डॉ. राजीव डोंगरे, साईनाथ मतसागर, रिखब पाटणी, उत्तम निकम, प्रशांत शिंदे, सुनिता साखरे, राजेंद्र मगर, प्रशांत शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, माजी नगराध्यक्ष साबेरखान आदी उपस्थित होते.
Social Plugin