२५ जागांसाठी होईल निवडणूक
वैजापूर: आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पालिकेच्या प्रभागरचनेसह व भौगोलिक सीमेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात एकूण १२ प्रभागातील २५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून यात दोन सदस्यीय प्रभाग ११ तर तीन सदस्यीय प्रभाग एक आहे.
आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पालिकेने प्रभागरचना व प्रभागाची व्याप्ती जाहीर केली आहे. शहरात एकूण १२ प्रभाग राहणार असून या प्रभागातून २५ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. शहरातील ११ प्रभाग दोन सदस्यीय तर १ प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक तीन तर अन्य ११ प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यात प्रभाग क्रमांक १२ हा सर्वात मोठा आहे. पालिकेने प्रभागरचना, मतदारसंख्या व परिसर निश्चित केला आहे.
सन २०११ जनगणनेनुसार शहरात ४१ हजार २९६ मतदार आहेत. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग व भौगोलिक सीमेबाबत ३१ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविता येतील. हरकती प्राप्त झाल्यानंतर त्या शासनाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल.
पालिकेने जाहीर केलेली प्रभागरचना व प्रभागनिहाय मतदारसंख्या अशी-
प्रभाग क्र. १ (मतदार संख्या-३०३३)
जलशुद्धीकरण केंद्र, शिवाजी नगर, ईदगाह नगर, देवीमंदिर, भिल्ल वसाहत, नाईकवाडी वस्ती, नौगजी बाबा दर्गा, कादरी नगर, करुणा निकेतन, इंद्रनील सोसायटी, अयोध्या नगर, राजपूत नगर, जीवनगंगा सोसायटी, बाजरा फार्म,
प्रभाग क्र. २ (मतदार संख्या-३३१३)
आनंदनगर, मर्चेंट कॉलनी, सुखशांतीनगर, शिवप्रतापनगर, संतोषीमातानगर,शिक्षक कॉलनी, सावता नगर, दत्त मंदिर परिसर, हुतात्मा स्मारक परिसर, पंचशील नगर, मिल्लत नगर, भारत नगर आणि परिसर
प्रभाग क्र. ३ (मतदार संख्या-३१८४)
नौगजी पार्क, गोल्डन नगर, दर्गा बेस, पोलीस कॉलनी, मर्चट बैंक परिसर, मोंढा मार्केट परिसर, श्रीराम हॉस्पिटल परिसर, राज्य वखार महामंडळ गोदाम, महाराष्ट्र राज्य बीज वितरण कार्यालय, नगर परिषद उद्यान परिसर, भालेराव वस्ती, पोलीस वसाहत
प्रभाग क्र. ४ (मतदार संख्या-३०९९)
नगर परिषद वैजापूर कार्यालय, दर्गा वेस परिसर, पोलीस स्टेशन परिसर, परदेशी गल्ली, महाराणा प्रताप रोड, राजपूत समाज जुनी मढी, एकटा विठ्ठल मंदिर परिसर, महात्मा गांधी रोड, जुनी भाजी मंडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, कोर्ट परिसर,पंचायत समिति,संतोष ऑईल मिल परिसर,शास्त्रीनगर
प्रभाग क्र. ५ (मतदार संख्या-३४२४)
महादेव मंदिर परिसर, जाधव गल्ली, संताजी जगनाडे चौक, माळी गल्ली, हलदी गल्ली, कसाई गल्ली, लाडवानी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसर, संतोषीमाता मंदिर परिसर, सुंदर गणपती मंदिर परिसर
प्रभाग क्र. ६ (मतदार संख्या-३०८४)
कुंभार गल्ली, पीरजाद गल्ली, काझी गल्ली, सावित्रीबाई फुले शाळा परिसर, जैन स्थानक परिसर, शुभम गणपती मंदिर परिसर, चिंतामणी गणपती परिसर, लिंगायत समाज मठ परिसर, नवीन मढी परिसर, काटे मारुती मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, त्याच प्रमाणे नारंगी नदीलगतचा पूर्वेकडील परिसर, नाईकवाडी गल्ली.
प्रभाग क्र. ७ (मतदार संख्या-३६२५)
स्वामी समर्थ मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय परिसर, पाटील गल्ली, लोहार गल्ली, संत गाडगे महाराज परिसर, दत्त मंदिर परिसर, धनगर गल्ली, आंबेडकर नगर, आणणा भाऊ साठे नगर, संत रोहिदास सामाजिक मंदिर परिसर, धोबी गल्ली, सुत्तार गल्ली, इंगळे गल्ली, सप्तशृंगी माता मंदिर, नौगाजी मस्जिद परिसर, मुळे गल्ली.
प्रभाग क्र. ८ (मतदार संख्या-३२५८)
वाघ वस्ती, विनायकराव पाटील महाविद्यालय परिसर, उक्कडगाव रोड, जोरे वस्ती, धरणग्रस्त परिसर, ना.म.का. वसाहत, अहिल्याबाई नगर, बन्सीलाल नगर, 132 KV स्टेशन, श्रीकृष्ण नगर, शंकर नगर, वाणी वस्ती, कोपरगाव रोड, स्मशानभूमी (अमरधाम), खंडोबानगर
प्रभाग क्र. ९ (मतदार संख्या-३४१९)
नवीन बस स्थानक, सन्मीक कॉलनी, मुस्तफा पार्क, बौध्द विहार, उपजिल्हा रुग्णालय, वसंत क्लब, बर्डी मजिद, जि.म.गेस्ट हाऊस, डी.एड. कॉलेज, निवारानगरी, स्वामी समर्थ नगर, डोंगरे हॉस्पिटल परिसर
प्रभाग क्र. १० (मतदार संख्या-३०१६)
पोस्ट ऑफिस परिसर, शनी मंदिर परिसर, गुरुद्वारा परिसर, खान गल्ली परिसर, मुरारी पार्क, तांबे हॉस्पिटल परिसर, प्रमिलाताई धुमाळ मंगल कार्यालय, तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम कॉलनी, तलाठी कॉलनी.
प्रभाग क्र. ११ (मतदार संख्या-३३७७)
जुने बस स्टॅंड, नवजीवन कॉलनी, लक्ष्मीनगर, विश्वनाथ नगर, एस टी डेपो, हुतात्मा जगन्नाथ कॉलनी, यशवंत कॉलनी, आदर्श कॉलनी, साई पार्क परिसर
प्रभाग क्र. १२ (मतदार संख्या - ५४६४)
संभाजीनगर,विद्यानगर,इंदिरानगर,दुर्गानगर, निर्मला इंस्टीट्यूट,देवडोंगरी, तलाठी कॉलनी, शिवशंकर नगर, लक्ष्मीनारायण नगर, पंडित नगर, रामगिरी नगर, टेके नगर, सुभद्रा नगर
पालिकेने प्रभागरचना व प्रभागाची व्याप्ती जाहीर केली आहे. परंतु यासंदर्भात ज्यांना हरकती नोंदवायच्या असतील त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदवाव्यात. २६ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर होईल.
- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर
Social Plugin