Hot Posts

6/recent/ticker-posts

Seed hoarding | आधी बनावट गिऱ्हाईक पाठवले मग जाळ्यात अडकवले; विशेष पथकाची धडक कारवाई, काय आहे प्रकरण?

 खंडाळ्यात बियाणे साठेबाजीचा भांडाफोड  


 वैजापूर: छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने  वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द शिऊर व खंडाळा येथील कृषी सेवा केंद्रांची मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बनावट ग्राहक पाठवून तपासणी केली असता खंडाळा येथील कृषी सेवा केंद्रातून  कपाशीचे यू. एस. ७०६७ या  बियाणांची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यास दिले नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खंडाळा येथील महाराष्ट्र कृषी सेवा केंद्राची तपासणी करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. दरम्यान बहुतांश कृषी सेवा केंद्रावर बियाणांची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे दुकानदारांच्या उरात धडकी भरली आहे.


बियाणे ज्यादा दराने तथा लिंकिंगबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  वैजापूर तालुका येथील लोणी खुर्द, शिऊर तसेच खंडाळा येथे मंगळवारी (१० जून) डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली. यावेळी खंडाळा येथील महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र येथे ग्राहकांनी मागितलेले कपाशीचे यू. एस. ७०६७ बियाणे दुकानांमध्ये साठा असताना चढ्या दाराने विक्री करण्याच्या हेतूने शेतकऱ्यास दिले नाही. 

नवे RTO कार्यालय नागरिकांच्या सेवेत; आमदारांच्याहस्ते उद्घाटन

त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्राची तपासणी करून तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. 

हेही वाचा: दागिने चोरणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

ही कारवाई कृषी विकास अधिकारी  प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी  पंकज ताजने, वैजापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी जे.डी. वाघमारे व विस्तार अधिकारी रॉयल धुळे या जिल्हा पथकामार्फत करण्यात आली.