मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वादंग निर्माण झाले असून ही कबर उखडून टाकण्यासाठी विविध पक्ष, संघटनांकडून मागणी होत असतानाच सराला बेटाचे (Sarala Bet) मठाधिपती रामगिरी महाराजांनीही (Ramgiri Maharaj)आता या वादात उडी घेतली आहे. भारतात औरंगजेबाची कबर कशासाठी पाहिजे? असा सवाल करून त्यांनी कबर उखडून टाकण्यासाठी एकप्रकारे सहमती दर्शवली आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb tomb controversy) राज्यातील वातावरण तापले असून, ती हटवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. यासाठी विविध ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत.
या आंदोलनाला आता रामगिरी महाराज यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. औरंगजेबाची कबर यापूर्वीच हटवायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच, इतिहास पाहता, अशा क्रूर शासकाची कबर भारतात का ठेवली जाते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराजांनी औरंगजेबाला क्रूर शासक म्हणून संबोधले असून, त्याने अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. कुंभमेळ्यावर हल्ला केला, तसेच संभाजी महाराजांना धर्मांतरासाठी अमानुष यातना दिल्या. त्यामुळे अशा व्यक्तीची कबर ठेवायचे काहीही कारण नाही, असेही ते म्हणाले.
कबर काढण्याच्या मागणीसाठी सध्या जी आंदोलने सुरू आहेत. त्यासाठी माझे समर्थन आहे,असल्याचे रामगिरी महाराज म्हणाले. नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराबाबत (Nagpur violence) रामगिरी महाराज म्हणाले की, दंगल घडवून आणणारे हे औरंगजेबाच्या विचारसरणीचेआहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे. सध्या अराजकता पसरवली जात आहे. असेही ते म्हणाले. वृत्त वाहिन्यांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी एका धर्मगुरूंबद्दल प्रक्षोभक विधान केल्यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. तेव्हापासून महाराजांना पोलिस बंदोबस्त होता. आता महाराजांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीवरून विषय छेडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
Social Plugin