Hot Posts

6/recent/ticker-posts

Crime News | मुलबाळ होत नसल्यानेच पत्नीनेच पतीला..; पुढं जे घडलं ते सुन्न करणारं!

 झोपलेल्या पतीच्या डोक्यात दगड


 लासूरस्टेशन: लासूरस्टेशन (ता. गंगापूर) येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा हौदात पडून मृत्यू झाल्याचे भासवणारी पत्नीच अखेर आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले असून मुलबाळ होत नसल्याने नवऱ्याचा डोक्यात दगड घालून त्याला यमसदनी पाठविल्याची कबुली पत्नीने दिली आहे. शिल्लेगाव पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून शिक्षकाच्या मनोरुग्ण पत्नीला अटक केली आहे.


गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (वय ६४ वर्षे) यांचा १३ मार्चला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना प्रथमदर्शनी समोर आली होती. 

दरम्यान या शिक्षकाचा हौदात पडून मृत्यू झाला की घातपात आहे? याबाबत ग्रामस्थ उलटसुलट चर्चा करीत होते. शिल्लेगाव पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत तपास करून या संशयास्पद प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी भौतिक पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला असता निवृत्त शिक्षकांच्या मनोरुग्ण पत्नीचा पोलिसांना दाट संशय येत होता. 

पोलिसांनी अखेर मयत शिक्षकाच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मनोरुग्ण पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय ५१ वर्षे) हिनेच नवऱ्याला संपविल्याची कबुली पोलिसांना दिली. लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्यात नेहमी वाद होत होते. घटनेच्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. 

रात्री पलंगावर झोपलेल्या माझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून संपविल्यानंतर कुणाला संशय येऊ नाही म्हणून त्यांचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात ओढत नेऊन टाकला. अशी कबुली तिने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी भारती पमुसिंग पपैया  अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.