जमाव करण्यात हात; सीसीटीव्ही फुटेज जप्त
नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूरच्या महाल, हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या जाळपोळ व दगडफेक प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फहीम खान शमीम खान (३८ रा. संजयबाग - कॉलनी, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव - आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून त्यानेच ही दंगल भडकवल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून दिली आहे. पोलिस - फहीम खानची विविध बाजूंनी चौकशी करीत आहेत. या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती मास्टरमाईंड होता की एखाद्या संघटनेचा यात हात होता? याचा तपासही पोलिस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खान याने विहिंप - बजरंग दलाच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा - बेकायदेशीर जमाव जमविला व गणेशपेठ पोलिस - ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन - करणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फहीम खान शमीम खान याच्यासोबत सैफ अली खान रौफ खान (२८) रा. वाठोडा, शेख मोहम्मद नादीम शेख सलीम (३५) रा. यशोधरनगर, शाहनवाज रशीद शेख (२५) रा. पारडी, मोहम्मह हरीश उर्फ मोहम्मद इस्माईल (३०) रा. गांधीबाग, युसूफ शेख उर्फ अब्दुल हफीज (२५) रा. महाल, शेख सादिक शेख नबी (४१) रा. महाल, मो. युसूफ उर्फ अब्दुल हफीज शेख (रा. महाल), असीम शेख समशुज जमा (२४) रा. भालदारपुरा हे देखील होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला व शांतता ठेवण्याबाबत समज देण्यात आली होती. मात्र असे करूनही या समाजकंटकांनी ४ वाजता एका गटातील जमावाला एकत्रित करण्याचे संदेश देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाचशे ते सहाशे जण एकत्रित आले. फहीम खानच्या उपस्थितीतील जमावातील नागरिकांना भडकावून घोषणा देण्यास सुरुवात केली व तेथून वातावरण बिघडल्याचे सांगण्यात आले.
'औरंगजेब' हा मुद्दा सुसंगत नाही
नागपूरमधील हिसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या हिसाचारावर संघाने हिसाचार समाज स्वास्थासाठी चांगला नाही आणि औरंगजेब आजच्या घडीला सुसंगत नाही, असे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनिल आंबेकर यांनी पत्रपरिषद घेऊन संघाची भूमिका मांडली. समाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ कोणत्याही हिसाचाराचे समर्थन करत नाही. नागपूरमधील हिसाचाराच्या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सुनिल आबेडकर यांनी मांडली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागेतील स्मृतीभवनात जाणार का ? याबद्दल स्पष्टता नाही. मात्र, मी एक सांगू शकतो की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हेडगेवार स्मारकावर गेले होते, असेही आंबेकर यांनी म्हटले.
Social Plugin