Hot Posts

6/recent/ticker-posts

Holi Festival | कृत्रिम रंगाच्या जगात 'पळस' कायम! फुले बहरली, रंग मात्र इतिहासजमा

आयुर्वेदातही आहे महत्त्व 


 'फ्लेम ऑफ द फायर' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल, केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरला आहे. ही पळसाची झाडे सध्या सर्वत्र वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. शिशिराची थंडी ओसरायला लागली. पानगळीने उघडी पडलेली वृक्ष नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागले की वसंताची चाहुल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण होऊन निसर्गाचा रंगोत्सव सुरू होतो. शिशिरात शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस सध्या डोंगर - वाटेवर सर्वत्रच बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाहवयास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसाराखे दिसत आहेत. 



२० २५ फुट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तीभावाने वापरली जातात. कुठेही गेले तरी 'पळसाला पाने तीनच आशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात होत्या. आता काळ बदलला, तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे. खोड, फांद्या वेड्यावाकड्या असतात तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठे असतात, म्हणूनच त्याचा पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात.


काळ बदलला तरी महत्त्व कायम

कुठेही गेले तरी पळसाला पाने तीन अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पाणे गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. पूर्वी या पानापासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी पत्रावळ्या बनविल्या जातात. काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पळस हा डोंगराळ भागात किवा शेताच्या बांधावर दूरवरून दिसणारा वृक्ष आहे‌


 बहुगुणी पळस

सध्या पळसाची झाडे लाल, केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाच्या फुलांनी लगडलेली लगडलेली दिसत आहेत. रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर पूर्वी होत होता एकमेकांच्या अंगावर रंग टाकण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी, वनस्पती म्हणून याचा वापर आहे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहिसा होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे. बियांचाही औषधासाठी वापर केला जातो. पोळ्याच्या सणाला मुळीचा वापर केला जातो. अशा बहुगुणी वृक्षाला पळस म्हणतात.


पळसाच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व 

रंगपंचमी अथवा धुलिवंदनाला पळसाच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात धुलिवंदनाच्या दोन दिवस अगोदर पळसांची फुले पाण्यात भिजवून ठेवून त्याचा रंग तयार केला जात असे. परंतु काळानुसार धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात वेगवेगळे रंग येऊ लागले. परिणामी पळसाच्या फुलांचा रंग आता धुलिवंदनाला इतिहासजमा झाल्यासारखा आहे.