Hot Posts

6/recent/ticker-posts

Tractor Accident | शेतनांगरणी बेतली जिवावर; ट्रॅक्टरसह चालक थेट विहिरीत, कशी घडली घटना?

 कापूसवाडगाव येथील घटना

वैजापूर: शेत नांगरताना तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ०४ जून रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील कापूसवाडगाव घडली. 


 अमोल अशोक गिरी (३६ रा. कापूसवाडगाव ) असे घटनेतील मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल गिरी हे कापूसवाडगाव येथील रहिवासी होते. 


दरम्यान बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते त्यांच्या वांजरगाव रस्त्यालगत असलेल्या शेत गट क्रमांक २०१ मधील शेतात ट्रॅक्टरने नांगरत होते. नांगरटी दरम्यान शेतातील विहिरीला कठडा नसल्याने त्यांना विहिरीचा अंदाज आला नाही. 


यामुळे ते नांगरटी करताना ट्रॅक्टरसह थेट विहिरीत जाऊन पडले. घटना घडल्यानंतर काही वेळानंतर परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने त्या ठिकाणी अमोल यांचे कुटुंबीय व अन्य नागरिक  जमा झाले. 


दुपारी साडे तीन वाजता त्यांचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ग्रामस्थांचे मदतकार्य!

दरम्यान घटनेनंतर सरपंच  नानासाहेब थोरात,  पोलीस पाटील गणेश कदम,पंजाबराव थोरात, सचिन निगळ, महेश्वर सोनवणे, वाल्मिक कदम,सोमनाथ सोनवणे, गणेश तिपली सचिन तिपली,सुधीर फुकटे, किरण फुकटे, हेमंत सोनवणे, सागर गवळी यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले.