Hot Posts

6/recent/ticker-posts

Company on fire | 'या' कंपनीला अचानक आग लागली अन् लाखोंचे झाले नुकसान!

  कन्नड: तालुक्यातील चापानेर येथील बिकेट कंपनीला रविवारी सायंकाळच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे तीन ते चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.


आग विझवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पदमपुरा केंद्राकडून एक बंब रवाना करण्यात आला. अधिकारी लक्ष्मण कोल्हे यांचे एक पथक घटनास्थळी पोहेचले होते. चापानेर गावच्या अलीकडे बिकेट कंपनीला आग लागल्याचे दशरथ सोमने यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळविले. सायंकाळच्या सुमारास धडकलेल्या माहितीनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुख्य अग्निशमन दल पदमपुरा पथकाने आग आटोक्यात आणली. बिकेट कंपनी ही भुश्श्याची गट्टू तयार करणारी आहे. या कंपनीतील आगीच्या घटनेत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अग्निशमन विभागाच्या एका वाहनासह कन्नड कारखान्याचे एक पाण्याचे टँकरही होते, असे सांगण्यात आले.