एमएसआरडीसीचा निर्णय
राज्यातील सर्व वाहनांना आता फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०२५ नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग असणे अनिवार्य असणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC ) द्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझांवर आता फास्टॅगद्वारे पैसे भरणे बंधनकारक असणार आहे. मात्र जे वाहनधारक या पद्धतीचा स्वीकार करणार नाहीत किंवा या पद्धतीने शुल्क भरण्यास असमर्थ असतील तर त्या वाहनधारकांना १ एप्रिलनंतर दुप्पट टोल भरावा लागणार आहे. या संदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
Social Plugin