Hot Posts

6/recent/ticker-posts

Ladki Bahin Yojana | 'लाडक्या बहिणीं'साठी खुशखबर ! 'या' महिन्याचा हप्ता पडला का? लगेचच खाते तपासा!

 एप्रिलचे अनुदान पडायला सुरुवात 

मुंबई: आज येईल, उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) हप्त्याची आस लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर गुड न्यूज मिळाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनो पटापट तुमचे खाते चेक करा. तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल. सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असले तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही. तेही पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महिलांना आजपासून एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने ही महत्त्वकांक्षी योजना सुरू केली असून त्याचाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा झाली आहे. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम एप्रिल महिन्याची आहे. मे महिन्याची रक्कम अजून यायची बाकी आहे. त्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, एप्रिल महिन्याची रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाली असून ही रक्कम तुम्ही चेक करू शकता.

 काय म्हणाल्या होत्या आदिती तटकरे?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्यात आला नव्हता. मे उजाडला तरी हप्त्याची काहीच माहिती मिळत नसल्याने ही योजना बंद होणार की काय अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा दिला होता. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, अशी माहिती आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांनी दिली होती. त्यानुसार आजपासून महिलांच्या खात्यात रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे.