Hot Posts

6/recent/ticker-posts

Fraud | 'तो' म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् 'ह्यांनी' त्याला लाखो दिले! काय आहे नेमकं प्रकरण?

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

  पैशांचा पाऊस पाडतो. असे म्हणून आठ जणांची ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वेणुनाथ कचरू त्रिभुवन व सचिन शिवाजी जाधव दोघे रा. कापूसवाडगाव (ता. वैजापूर ) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी गावातील काही ग्रामस्थांना पैशांचा पाऊस पाडतो. असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले.एकमेकांचे नातेवाईक व संपर्कात आलेले आठ जण त्यांच्या आमिषाला बळी पडले.वैजापूर तालुक्यातील ४ व छत्रपती संभाजीनगर येथील ४ जणांची त्यांनी ६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली.या प्रकरणी लक्ष्मी रमेश अस्वले रा.भावसिंगपुरा,  छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी विरूद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे करीत आहेत.