१३५ ग्रा. पं. च्या सरपंचपद आरक्षण सोडत
वैजापूर: आगामी पाच वर्षाच्या म्हणजे २०२५-३० या कालावधीसाठी वैजापूर तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर महिलाच 'कारभारणी' असणार आहे.
सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व तहसीलदार सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. संस्कृती कावळे या मुलीने चिठ्ठीद्वारे सरपंचपदाचे आरक्षण काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यानुसार तालुक्यात आगामी पाच वर्षांत ६८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. यात ९ ग्रामपंचायतींवर अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला, ५ ग्रामपंचायतींवर अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिला, १८ ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व ३५ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सरपंचपदावर विराजमान होणार आहेत. अन्य प्रवर्गाच्या विचार केल्यास ९ ग्रामपंचायतींवर अनुसुचित जाती, ४ ग्रामपंचायतींवर अनुसुचित जमाती, १८ ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्ग व ३६ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार सरपंच होणार आहेत. ग्रामपंचायतनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:
अनुसुचित जाती महिला
भग्गाव, नागमठाण, अगरसायगाव, अमानतपूरवाडी, धोंदलगाव, हाजीपूरवाडी/तरट्याचीवाडी, कांगोणी/नारायणपूर, हिलालपूर/कोरडगाव, नायगव्हाण/वळण
अनुसुचित जमाती महिला
भादली, भायगाव /वैजापूर, हडसपिंपळगाव, जरुळ, नादी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
फकीराबादवाडी, चिकटगाव, देवगाव शनि, गोळवाडी मिरकनगर औरंगपूर, खिर्डी हरगोविंदपूर, पिंपळगाव खंडाळा, आघूर, मनेगाव, साकेगाव, बाभुळखेडा, खिर्डी कन्नड, शाहजतपूर, पालखेड, संजरपूरवाडी, मालेगाव कन्नड, साळेगाव, लाखखंडाळा, चेंडूफळ, झोलेगाव व मनूर
सर्वसाधारण महिला
बाबतरा, बेलगाव, भऊर, भटाणा, भालगाव, चांदेगाव, चिंचडगाव, चोरवाघलगाव, दहेगाव/ राहेगव्हाण/ लखमापूरवाडी, घायगाव, हनुमंतगाव, हिंगणे कन्नड, जांबरगाव, करंजगाव, कविटखेडा/बिरोळा, कापूसवाडगाव, खरज/तित्तरखेडा, लाखणी/जांबरखेडा, लाडगाव, माळीघोगरगाव, नगिनापिंपळगाव, परसोडा, पेंडेफळ, सावखेडखंडाळा, सुदामवाडी, टुणकी/दसकुली, वाकला, वांजरगाव, नालेगाव, वैजापूर ग्रामीण एक, गारज, पानगव्हाण, बिलोणी, रघुनाथपुरवाडी, बळ्हेगाव, बाभुळगाव खुर्द
अनुसुचित जाती प्रवर्ग
हिंगोणी, जळगाव, शिवगाव/पाथ्री, लासुरगाव, माळीसागज, बाभुळतेल, म्हस्की/सिद्वापुरवाडी, गोयगाव व वैजापूर ग्रामीण दोन या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.
सर्वसाधारण प्रवर्ग
अलापूरवाडी, बल्लाळीसागज, बेंदवाडी, भगूर, भायगावगंगा, भिंगी, भोकरगाव/बायगाव, डवाळा, डोणगाव, जानेफळ, जिरी/ मनोली, कनकसागज, खंडाळा, लाखगंगा, लोणी खुर्द, महालगाव, मांडकी, निमगाव/गोंदगाव, पानवी खंडाळा, पानवी बुद्रुक/वक्ती, पानवी खुर्द, पुरणगाव, रोटेगाव, सफियाबादवाडी, सावखेडगंगा, सुराळा, टाकळीसागज, टेंभी/ कऊटगाव, तलवाडा, तिडी/ मकरमतपूरवाडी, वडजी, वाघला, चांडगाव, नांदूरढोक बाभुळगावगंगा, राहेगाव /राजुरा /उंदिरवाडी, सोनवाडी/ पाशापूर व शिवराई या ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे.
नागरिकांचा मागासवर्ग
त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अंचलगाव, बाभुळगाव बु., बोरसर, भिवगाव, डागपिंपळगाव, एकोडीसागज, गाढेपिंपळगाव, पारळा, पोखरी, सिरसगाव, सवंदगाव, बाजाठाण, नांदगाव, खंबाळा/ किरतपूर, जातेगाव, वीरगाव /मुर्शदपूर, शिऊर व अव्वलगाव / हमरापूर या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जमाती
कोल्ही, नारळा, लोणी बुद्रुक व सटाणा या ग्रामपंचायती अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत.
Social Plugin