Hot Posts

6/recent/ticker-posts

Ration card E-KYC | ..तर स्वस्तधान्य होणार बंद; त्यासाठी करावी लागणार 'ही' पूर्तता

१५ मार्चपर्यंत मुदत 


 स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य घेणाऱ्या जिल्ह्यातील ६ लाख ८९ हजार ७१७ लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसून १५ मार्चपर्यंत ई-केवायसी न केल्यास त्यांचे धान्य बंद होणार आहे.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य घेणाऱ्या प्रत्येक शिधापत्रिकाधारकाच्या नाव नोंद असलेल्या सदस्याची ई-केवायसी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडिंग करून घ्यायचा आहे.

ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरण होणार आहे. यासाठी आहे. आता पुन्हा एकदा शेवटची शासनाने वारंवार मुदतवाढ मुदतवाढ १५ मार्च आहे, असे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार आहे. जिल्ह्यातील एकूण २३ लाख ७९ हजार ६९५ लाभार्थ्यांपैकी १६ हजार ९० हजार १७८ लाभार्थ्यांनी ४ मार्चअखेरपर्यंत ई-केवायसी केली असून ६ लाख ८९ हजार ५१७ लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही.

त्यात पैठण तालुक्यातील ९३ हजार ६१६, खुलताबाद तालुक्यातील २५ हजार ९५, गंगापूर तालुक्यातील ४९ हजार ६१५, फुलंब्री तालुक्यातील ३४ हजार ८१२, छत्रपती संभाजीनगर शहरामधील १ लाख ५३ हजार ८७७, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील ८५ हजार ३०७, कन्नड तालुक्यातील ५८ हजार ९२८, सिल्लोड तालुक्यातील ८० हजार १५९ लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.

ई-केवायसीपासून वंचित

@ ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र असतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध लागणार आहे.

@ अनेक लाभार्थी पात्र नसतानाही या योजनेतून धान्य घेत असल्याने शासनाचा या योजनेमागचा उद्देश सफल होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

@ त्यामुळे भविष्यात आता जिल्ह्यातील किती  लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लवकर ई-केवायसी करा 

या लाभार्थ्यांनी १५ मार्चपूर्वी ई-केवायसी न केल्यास त्यांचे धान्य बंद होणार आहे. स्वतः लाभार्थी त्यास जबाबदार राहतील. त्यामुळे लवकरात लवकर या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.