विभागीय आयुक्तांचे आदेश 'धुडकावले'
वैजापूर: शासनाने ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कितीही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले तरी सरकारी 'बाबू' मात्र या उपक्रमांना हरताळ फासून 'घरचा आहेर' देतात. शासनाच्या 'ग्रामदरबार' संकल्पनेला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीच सुरूंग लावल्याचे समोर आले आहे. गावात ग्रामदरबारत आयोजित करण्यात आला अन् अधिकाऱ्यांनीच 'दांडी' मारून शासन उल्लंघन केल्याचे उघडकीस आले. गटविकास अधिकाऱ्यांसह सहायक गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
ग्रामीण भागातील समस्या जागेवर मार्गी लगावे यासाठी विभागीय आयुक्तानी एकदिवस गावकऱ्यांसोबत हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.परंतु या उपक्रमाचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. खंडाळा येथे आयोजित करण्यात अलेल्या ग्राम दरबारात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले. परंतु उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनीच दरबारत दांडी मारल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थानी थेट आयुक्तांकडेच प्रशासनाच्या ग्राम दरबारत अधिकारीच गायब राहत असल्याची तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान,एक दिवस गावकऱ्यांसाेबत या उपक्रमाचे केवळ कागदी घोडे नाचवून अहवालाची पुर्तता करण्यात अधिकारी धन्यता मानत असेल तर अभियानचा उद्देश साध्य होणार का? याबाबत साशंकता आहे.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम सुरु केला आहे. आठवड्यातील एक दिवस एका गावात प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागातील अधिकारी जाऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवितील. ज्या अडचणी जागेवर सोडवणे शक्य आहे. त्या समस्या लगेच सोडवण्यात येतील. तसेच सरकारने अनेक योजना नागरिकांच्या विकासासाठी आणल्या आहेत. त्याची माहिती ग्राम दरबारात जमलेल्या ग्रामस्थांना द्यावी. असे आदेशित केले आहे.
तालुक्यातील खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामदरबारचे सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले होते.या ग्रामदरबारत गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, सहायक गटविकास अधिकारी अक्षय भगत, विस्तार अधिकारी अमेय पवार ग्रामस्थांसोबत संवाद साधून विविध योजनांची माहिती देणार होते.
परंतु यापैकी कोणताच अधिकारी या ग्रामदरबारत फिरकले नाही.शेवटी दरबार सुरु झाल्यानंतर एकतास उशीराने विस्तार अधिकारी रंजना राठोड आल्या. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थानी गटविकास अधिकारी व अन्य अधिकारी कुठे आहे? याचा जाब ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विचारला. यावेळी राठोड यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामदरबारत समस्या व प्रश्न सुटले नाही.केवळ गोंधळच उडाल्याचे बघयला मिळाले.
पदाधिकाऱ्यांची उदासीनता
तालुक्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल म्हणून ओळख असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतला जणू घर-घर लागली आहे.विकासकामांच्या नावावर केवळ गट्टू बसवून धुळफेक करणे. सिमेंट रस्ते, गटारींचे कामे करणे या पलिकडे कोणत्याच मोठ्या योजना राबविण्याचे धाडस येथील पदाधिकारी करताना दिसत नाही. सदस्यांची अंतर्गत गटबाजी व लाचलुचपत विभागाच्या रडारवर काही सदस्य आल्यापासून गावाचा विकास पूर्णपणे खुटला आहे.सदस्यांचा कार्यकाळ मोजून आठ महीने शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे काही सदस्य केवळ वेळ काढत आहे तर काही सदस्य ग्रामपंचायतकडे फिरकत देखील नाही.धक्कादायक म्हणजे खात्यावर करोडो रूपयांचा निधी पडून आहे.परंतु योजना राबवणार कोण? दरम्यान ग्रामदरबारत अनेक प्रश्नांच्या समस्यांविषयी ग्रामस्थ आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी जमा झाले होते.परंतु येथेही अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे ग्रामस्त आक्रमक झाले होते.
Social Plugin