मुंबई (Chitra Wagh Vs Anil Parab): दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणावरील पुर्नविचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले, मात्र मनिषा कायंदे यांच्या जुन्या ट्विटवरून वाद संजय राठोड यांच्यावर पोहोचला. अनिल परब (Anil Parab ) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना 'सरड्याप्रमाणे रंग बदलतात', अशी टीका करताच चित्रा वाघ व अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वाघ यावेळी चांगल्याचं आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
विधान परिषद सभागृहात मनिषा कायंदे यांनी दिशा सालियनचा विषय मांडला. दिशा सालियानच्या वडिलांनी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर चर्चा सुरू होती. एसआयटीचा रिपोर्ट काय आहे, तो समोर यावा, एवढीच मी विनंती केली होती. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. 'दुध का दुध, पाणी का पाणी' झालं पाहीजे. मात्र विरोधकांनी संजय राठोड यांचा विषय मध्येच घेतला. संजय राठोड यांच्याबाबत तुम्ही काय केलं? असं विरोधक म्हणाले, पण मला जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, जे पुरावे आले, त्याच्यावर लढले मी. तुम्ही इथे तोंड शिऊन बसला होतात का? आणि मला विचारतात ते परत मंत्रिमंडळात कसे आले? पण अनिल परब यांच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरे यांना विचारायची. त्यांनीच क्लिनचीट दिली होती त्यांना.
संजय राठोड परत मंत्रिमंडळात का आले? याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मात्र सोईप्रमाणे अनिल परब यांचं राजकारण सुरू आहे आणि महिलांवर दादागिरी सुरू आहे. तुमच्यात खरंच हिम्मत असेल ना तर जाऊन उद्धव ठाकरेंना विचारा, की त्यांनी क्लिनचीट का दिली. 'अनिल परब यांच्यासारखे ५६ बघितले आहेत, तुमच्यासारखे पायाला बांधून फिरते', असा शेलक्या शब्दात चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली.
काय म्हणाले होते परब?
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सीबीआयने क्लीन चिट दिल्यानंतर मनिषा कायंदे यांनी ट्विट केलं होतं. ते ट्विट अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवलं. सीबीआयने आदित्य ठाकरेंनी क्लीन चीट दिली त्यावेळंच हे ट्विट आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियानचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याचं सीबीआयच्या अहवालात उघड झालं आहे. आणि राणे गॅंगने मात्र त्याचा या प्रकणाशी जोडून थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरेंची माफी मागावी, असं मनिषा कायंदे यांचं ट्विट होतं.
मनिषा कायंदेनी सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलला, सरड्यालाही लाज वाटली, अशी टीका त्यांनी केली. उपसभापतीच्या खुर्जीवर लक्ष आहे, वरिष्ठांना खूश करायंच आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करायचे, असा आरोपही त्यांना कायंदे यांच्यावर केला आहे. जयकुमार गोरे, संजय राठोड यांच्या बाबतीत सरकार गप्प का, किंवा महिला सदस्य गप्प का, असा सवालही त्यांनी यावेळी केला होता.
Social Plugin