जयपूर : गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajsthan Governor Haribhau Bagde) यांनी याबाबत सडेतोड मत नोंदविले आहे. ते म्हणाले की, ‘महिलांना त्रास छेडणाऱ्यांना मारहाण करून अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करून केले पाहिजे, तरच असे गुन्हे कमी होतील’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत राजस्थानमधील भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यासपीठावरून हे भाषण केले. बागडे म्हणाले की, ‘जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात राज्य करत होते, त्यावेळी गावाचा प्रमुख असणाऱ्या पाटलाने बलात्कार केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक आदेश काढला. बलात्कार करणाऱ्याला मारू नका, त्याचे हातपाय तोडून टाका. तो मरेपर्यंत तसाच राहिला पाहिजे, असा तो आदेश होता’.राज्यपाल बागडे पुढे म्हणाले की, ‘महिलांवर अत्याचार होतात तेव्हा लोक व्हिडिओ बनवतात. हे बरोबर नाही. कोणाही महिलेचा विनयभंग झाला, तर त्या पुरूषाला पकडा. तो माणूस आहे, तुही माणूस आहेस आणि तुझ्यासोबत २ ते ४ लोक येतील. जोपर्यंत आपल्या मनात ही मानसिकता येत नाही की, आपण घटनास्थळी जाऊन विनयभंग करणाऱ्याला, बलात्कार करणाऱ्याला थांबवावे आणि त्याला मारहाण करावी, तोपर्यंत हे गुन्हे थांबणार नाहीत’.
अत्याचारांच्या घटना रोज ऐकायला मिळतात
गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही हे माहित नाही. पण कोणी १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विनयभंग केला, अत्याचार केला किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत आणि असे प्रकार रोज ऐकायला मिळतात. यावरून असे दिसून येते की, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती बाळगणे काय असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? कायदे असूनही अशा घटना का घडतात, याबद्दल तुम्ही सूचना देऊ शकता? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असेही बागडे म्हणाले.
Social Plugin