Hot Posts

6/recent/ticker-posts

Crime News | अखेर 'त्या' वृद्धाचा मृत्यू; प्राणघातक हल्ला करून घर पेटविल्याचे प्रकरण

 नागमठाण येथे घडली होती घटना 


वैजापूर: तालुक्यातील नागमठाण येथे शेतातून कांद्याचे टॅक्टर नेल्याच्या वादातून वृद्धावर एकाने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेतील जखमी वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

          

याप्रकरणी रवींद्र हंसराज तांबे (२५)व त्याची आई संगीता हंसराज तांबे (५०) दोघे रा. नागमठाण दोघांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान चामले (६०) व त्यांची पत्नी मंगल (५०) हे दोघेही नागमठाण शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मधील शेतात रहिवासास आहेत. दरम्यान सोपान चामले यांनी रविंद्र यांच्या शेतातून स्वतःचे कांद्याचे ट्रॅक्टर नेल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. 

नेमक्या याच वादातून रवींद्रने  १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोपान यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सोपान चामले हे गंभीर जखमी झाले. याशिवाय त्यांच्या पत्नी मंगल या देखील जखमी झाल्या. रवींद्र याने त्यांच्या राहत्या पत्र्याच्या घराला देखील आग लावली होती. घटना घडताच सोपान यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मंगल चामले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिस ठाण्यात रवींद्र तांबे व संगीता तांबे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायलायीन कोठडी सुनावली आहे.