Hot Posts

6/recent/ticker-posts

Court Order | न्यायालयाने 'त्याला' ठोठावला दोन वर्षांचा कारावास; का दिली शिक्षा?

१ लाख २० हजारांची नुकसानभरपाई द्या!


वैजापूर: शहरातील धन्वंतरी महिला नागरी पतसंस्थेकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेच्या परत फेडीसाठी दिलेल्या धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावासासह १२००००/- (एक लाख वीस हजार रुपये) रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश वैजापूर येथील प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकारी व्ही.आर.कुलकर्णी यांनी दिले आहेत.


 याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर येथील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून प्रकरणातील आरोपी शेख इकबाल शेख मोहम्मद (रा. वैजापूर ) याने पतसंस्थेकडून  रुपये कर्ज घेतले होते.  कर्जाच्या रकमेची मुदतीत परतफेड न केल्यामुळे फिर्यादीने आरोपीकडे कर्ज खात्यावरील थकित रकमेची मागणी केली.  तेव्हा आरोपीने फिर्यादी पतसंस्थेस  ६० हजार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश पतसंस्थेने औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत ( मार्केट यार्ड, वैजापूर )  वटविण्यासाठी जमा केला. 

परंतु पुरेशा रकमेअभावी हा धनादेश न वाटताच अनादरी तत होऊन परत आला. त्यानंतर पतसंस्थेने आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्याची मागणी केली.  नोटीस मिळूनही आरोपीने धनादेशाची रक्कम मुदतीत पतसंस्थेकडे जमा केली नाही. त्यामुळे वैजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ॲड.  रामकृष्ण बोडखे यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्याच्या कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती.  

न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्यादीसह सादर केलेला साक्षी पुरावा व वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीस दोन वर्षांच्या कारावासह १ लाख २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे  ॲड.रामकृष्ण बोडखे यांनी काम पाहिले