Hot Posts

6/recent/ticker-posts

Clashes in court premises | न्यायालयाच्या आवारातच 'दे दणादण'; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

 सार्वजनिक ठिकाणी दंगलीचा आरोप 


वैजापूर न्यायालय परिसरात (Vaijapur Court Premises ) तिघांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील भऊर  येथील तिघांविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा (Vaijapur Police station) दाखल करण्यात आला आहे. 

भागिनाथ नामदेव जगताप, दीपक भागिनाथ जगताप व जालिंदर नामदेव जगताप अशी आरोपींची नावे आहेत. दुपारी न्यायालय क्रमांक दोन व तीनच्या समोर तसेच न्यायालय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी एकमेकांसोबत हाणामारी करुन शांतता बिघडवून दंगल केली.

 अशी तक्रार पोलिस कॉन्स्टेबल संभाजी भोजने यांनी पोलिसांत दिली आहे. त्यावरुन तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌अधिक तपास हवालदार भुरे करीत आहेत.