Hot Posts

6/recent/ticker-posts

Fraud | मृताच्या खात्यावरूनच हडपली रक्कम! भावासह पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल; कुठे घडली घटना?

वैजापूरच्या 'एचडीएफसी'त होते खाते 

मृत भावाच्या बँक खात्यातून परस्पर ७४ हजार लाटणाऱ्या भावासह पुतण्याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
                    
 प्रेमसिंग हिरालाल सुलाने व आकाश उर्फ उदय प्रेमसिंग सुलाने (दोघे रा.डोणगाव, ता.गंगापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई हिरालाल सुलाने (७५) या गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना तीन मुले व मुलगी असून यापैकी त्यांचा लहान मुलगा रमेश, त्याची पत्नी बसंती व नातू देवसिंग हे त्यांच्यासोबत रहिवासास होते.

 दरम्यान ११ ऑक्टोबर २०२२ रमेश याचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनाबाई या त्यांचा मोठा मुलगा रामसिंग सुलाने याच्या घरी मृत रमेश यांची पत्नी व मुलासह सुमारे वर्षभरापासून रहिवासास होत्या. रमेश याचा डोणगाव येथे मागील दहा ते बारा वर्षांपासून पोईट्री फार्मचा व्यवसाय होता. या व्यवसायासाठी त्याने वैजापूर शहरातील एचडीएफसी बँकेत खाते देखील उघडले होते. त्यावेळी खात्याच्या वारसदार म्हणून त्याने आई सोनाबाई यांचे नाव बँक खात्याशी जोडले होते. 

रमेश मरण पावला त्यावेळी त्याच्या बँक खात्यावर २३ हजार २०४ रुपये होते. त्यानंतर पुन्हा पोईट्री फॉर्मच्या व्यवसायातून संबधित कंपनीने त्याच्या खात्यावर ५१ हजार ४२१ रुपये जमा केले. यामुळे त्याच्या बँक खात्यात एकूण ७४ हजार ६५२ रुपये झाले. 

रमेश हा मयत झालेला असताना त्याचा भाऊ प्रेमसिंग व पुतण्या आकाश उर्फ उदय सुलाने या बाप लेकांनी संगनमत करून मयत रमेश याच्या बँक खात्याचे चेकबुक व पासबुक गैर हेतूने घेऊन गेले. त्यांनी लासूर स्टेशन येथील एचडीएफसी बँकेत मयत रमेश याच्या बँक खात्यातून २६ डिसेंबर २०२२ रोजी ७४ हजार रुपयांचा चेक वटवून घेतला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.