Hot Posts

6/recent/ticker-posts

Aurangzeb Tomb | औरंगजेब कबरीवरून संघटना आक्रमक; काय म्हणाले जिल्हाधिकारी बघा!

 छत्रपती संभाजीनगरऔरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्ष व संघटनांकडून कबर काढण्याच्या संदर्भात निवेदने येत असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (Collector Dilip Swami) यांनी म्हटले आहे.


औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी. या मागणीसाठी मोठ्याप्रमाणात निवेदन येत आहे. गेल्या आठ दिवसांत बजरंग दलासह अनेकांनी ही कबर काढून टाकावी यासाठी निवेदन दिले आहेत.  या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आम्ही सतर्क आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं. खुलताबाद आणि वेरूळमध्ये कडेकोट बंदोबस्त लावला आहे. 

राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरात ज्या ठिकाणी ही कबर आहे तिथे प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आलेली  असल्याचे ते म्हणाले.