Hot Posts

6/recent/ticker-posts

Sikandar Movie-Salman khan | सलमान खानचा 'सिकंदर' येतोय 'या' तारखेला!

 

 लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित व विकी कौशल अभिनित 'छावा' चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत छप्परफाड कमाई केली. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरला. त्यामुळे चित्रपटाने वेगवेगळे विक्रम स्थापित केले आहे. 'छावा'चा बोलबाला सुरू असतानाच आता रमजान ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर चित्रपट ( Sikandar Movie) येऊ घातला आहे.


सलमान खानच्या  आगामी 'सिकंदर' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे.  भाईजान या सिनेमातून पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवायला सज्ज आहे. 'सिकंदर' सिनेमाच्या रिलीजपूर्वी सिनेमाची गाणी, टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. परंतु असे असले तरी सर्वांना एकच प्रश्न पडला की, 'सिकंदर' नेमका रिलीज कधी होणार? अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण 'सिकंदर'च्या रिलीज डेटचा खुलासा झालाय. 

सलमानच्या 'सिकंदर' निमित्ताने एक गोष्ट बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच घडणार आहे. ती म्हणजे 'सिकंदर' शुक्रवारी किंवा बुधवारी नव्हे तर थेट रविवारी रिलीज होणार आहे. म्हणजेच 'सिकंदर' सिनेमा ईदनिमित्ताने ३० मार्चला संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. बॉलिवूड हंगामाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलमान खान, रश्मिका मंदाना या जोडीच्या 'सिकंदर' सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. या सिनेमात अभिनेता शर्मन जोशीही झळकणार आहे. मुंबईतील खास भागांमध्ये रिअल लोकेशन्सवर 'सिकंदर' सिनेमाचं शूटिंग झालंय. 'हॉलिडे', 'गजनी' यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलंय. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे सिकंदर चित्रपटगृहांमध्ये काय जादू करणार? हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे.