पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. दोन दिवसांपूर्वी भारताने आॅपरेशन सिंदूर राबवून वायू, सैन्यदलाने पाकिस्तानातील अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली. याशिवाय दोन्हीही देशांच्या सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सैन्यदलातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील एका जवानाचे 5 मे रोजी लग्न झाले अन् हळदीच्या अंगानाचे तो तिसऱ्याच दिवशी सीमेवर परतला.
अवघ्या 5-7 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुण पत्नीचं कपाळ पांढरं झालं. देश शोकसागरात बुडाला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंधांत तणाव वाढला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भारताकडून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम देशाचं संरक्षण खातं करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जवानांनी हात पिवळे केले.
यामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील (Manoj Patil Jalgaon) या जवानाचं देखील 5 मे रोजी लग्न झालं. म्हणजे लग्नाला आज अवघे 4 दिवस झालेत. नवरा-नवरीच्या अंगावरची हळद अजूनही ओली आहे. दोघांच्या हातावर काढलेली मेहंदी अजूनही रंग भरीत आहे. मात्र सीमेवरचा वाढता तणाव पाहता आर्मी मॅन मनोज यांना 8 तारखेला देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला.
लग्नसुखाच्या असंख्य स्वप्नांवर पाणी सोडून माझ्या भारतातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण झालं पाहिजे. हा विचार घेऊन मनोज पाटील तात्काळ ऑन ड्युटीवर हजर राहण्यासाठी रवाना झालेत. आज रेल्वे स्थानकावर जे दृश्य पहावयास मिळाले हे नक्कीच हृदयाला चटका लावणारं आहे.
एका डोळ्यातून देशसेवेसाठी जाणाऱ्या 'पती'बद्दल अभिमान आणि दुसऱ्या डोळ्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या पतीबद्दल अश्रू पहावयास मिळाले. 'ऑपरेशन सिंदूर'साठी (Operations Sindoor) नवविवाहितेचं 'कुंकू' आज ओल्या 'हळदी'ने रवाना झालंय.
Social Plugin