Hot Posts

6/recent/ticker-posts

Weather News | उष्णतेच्या लाटेसह गारपीट, पाऊस; महाराष्ट्रासह 'या' १४ राज्यांना सतर्कतेचा इशारा

 राज्यांच्या हवामानात अचानक बदल 


महाराष्ट्रासह भारतातील १४ राज्यांमध्ये येणार भयानक संकट येणार आहे. अनेक राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि गारपीटचा तडाखा बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. पूर्व बांगलादेशवर चक्राकार वारे आहेत. यामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक मोठा बदल होणार आहे. 


महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरीत हंगामातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. गुजरात व राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील १७ शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. १८ मार्चपर्यंत उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. अकोला -यवतमाळ- चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी २४ तासांचा इशारा दिला. गेल्या तीन दिवसांत चंद्रपूरसह विदर्भाची बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले आहे, होळीनंतर तापमानात झालेली वाढ नागरिकांसाठी चिंताजनक असणार आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम बर्फवृष्टीची आणि पावसाची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. दिल्लीतील हवामान मिश्रित असेल.

१४ ते १६ मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळे येतील. बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ४  दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. १४ ते १७ मार्च दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे ४०-५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल.  गुजरात, राजस्थान, ओडिशा, कोकण, गोवा, मध्यप्रदेश, मध्य महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगालच्या गंगा किनारी भागात आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.