Hot Posts

6/recent/ticker-posts

Chhaava Movie Collection | तुम्हाला माहिती आहे का? 'छावा'ने कमाईतही केला 'विक्रम'

 महिनाभरात ५४०.३८ कोटींची कमाई 

 


 लक्ष्मण उतेकर (Lakshman Utekar) दिग्दर्शित व विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनित 'छावा' चित्रपटाने (Chhaava Movie) नवेनवे विक्रम स्थापित केले आहे. बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) विक्रम केला आहे. आगामी काळातील चित्रपटांना 'छावा'ची बरोबरी साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर सलमान खानच्या 'सिकंदर' (Sikandar Movie) शिवाय कोणत्याही चित्रपटात विक्रमाची बरोबरी करण्याची ताकद दिसत नाही. 


 सुप्रसिद्ध साहित्यिक शिवाजी सावंत लिखित यांच्या छावा कांदबरीवर आधारित छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित असून हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाने दररोज एकामागून एक विक्रम रचले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ३० दिवस झाले आहेत. चित्रपटाने कमाईतही विक्रम केला आहे. 


आजपर्यंतचं चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती? याचा आकडा बघितला तर अचंबित करणारा आहे. माध्यमांच्या दाव्यानुसार 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवडाभरात २२५.२८ कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४. ९४ कोटी व चौथ्या आठवड्यात ४३.९८ कोटी रुपये अशी एकूण ५४०.३८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.