Hot Posts

6/recent/ticker-posts

ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! 'या' तारखेपर्यंत मिळणार मार्च महिन्याचा हप्ता

मंत्री आदिती तटकरेंची माहिती 

मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या  (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी एक दिलासा व आनंद देणारी बातमी आहे. येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच १२ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे (Two Month Installment) पैसे जमा होणार आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Development Minister Aditi Tatkare) यांनी ही माहिती दिली आहे. 


लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या १२ मार्चपर्यंत सलग दोन महिन्याचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार आहे. दरम्यान मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

 परंतु आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे (Aaditi Tatkare)यांनी दिली आहे. महिला दिनाचे औचित्य साधत आम्ही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना देत असून महिलांच्या खात्यात जमा पैसे होण्यास सुरुवात झाली असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी आदिती तटकरे यांनी सांगितले होते. परंतु असे असले तरी प्रत्यक्षात मात्र फेब्रुवारी महिन्यातील अनुदान लाभार्थी महिलांच्या बॅक खात्यात जमा झाले.

'तो' सुदिन म्हणावा लागेल!

 आता आदिती तटकरे यांनी १२ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा होईल. असं सांगितलं खरं. परंतु ज्या दिवशी रक्कम खात्यात येऊन पडेल. तो सुदिन म्हणावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्कम देण्यासाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर सरकारने मोठा गाजावाजा करून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकाचवेळी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु जागतिक महिला दिनी दोन हप्त्यांचे पैसे खात्यात जमा झालेच नाही.