४ लाख ५० हजार रुपये द्या
धनादेश अनादर प्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व ४ लाख पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश येथील न्यायाधीश डी.एस. पिसाळ यांनी दिले आहेत.
शेख शब्बीर शेख बशीर (५३ रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख याने एका नागरी सहकारी पतसंस्थेकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेख याने पतसंस्थेला ४ लाख ३३ हजार २०९ रुपये रकमेचा धनादेश दिला होता.
परंतु खात्यावर रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. फिर्यादीने आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम पंधरा दिवसात पतसंस्थेत जमा करण्यास सांगितले. परंतु नोटीस मिळूनही आरोपीने मुदतीत रक्कम जमा न केल्यामुळे फिर्यादी पतसंस्थेतर्फे व्यवस्थापक दिनेश राठी यांनी वैजापूर येथील न्यायालयात अॅड. ए. डी. कासलीवाल यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती.
न्यायालयाने प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. ए. डी. कासलीवाल व अॅड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.
Social Plugin