Hot Posts

6/recent/ticker-posts

Actor in love | 'तो' सुपरस्टार तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर! कोण आहे हा अभिनेता?

एका लग्नाची तिसरी गोष्ट!


'आता ६० व्या वर्षी लग्न करणे योग्य आहे की नाही'? हे माहीत नाही. पण सदाबहार अभिनेता आमिर खानने ( Amir khan ) जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 


आमिर खानने नुकताच त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी तो प्रेमात असल्याची कबुली देताना दिसला. आमिर खान गेल्या दीड वर्षांपासून 'गौरी'ला (Gauri) डेट करीत आहे. ही गौरी मुळची बंगळुरूची असून तिला ६ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. गौरी आमिर खानच्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करीत आहे. 

आमिरने मीडियाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गौरी आणि मी आम्ही दोघेही एकमेकांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो, गेल्या दीड वर्षापूर्वी मी तिला प्रपोज केलं होतं. आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत म्हणत आमिर खानने  तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान गर्लफ्रेंडचं नाव जाहीर करताना त्याने सलमान खान आणि शाहरुख खान दोघांनाही आमंत्रित केले होते. 

आमिर खानचे पहिले लग्न रिना दत्ता सोबत झाले होते. १९८६ साली पळून जाऊन त्यांनी लग्न केले होते. २००२ साली त्याने रिनाला घटस्फोट दिला आणि २००५ मध्ये तो किरण राव सोबत लग्नबंधनात अडकला होता. २०२१ मध्ये त्याने किरणला घटस्फोट दिला. आणि आता त्याने तिसऱ्या लग्नाची तयारी सुरू केलेली पाहायला मिळत आहे.