Hot Posts

6/recent/ticker-posts

Sangita Pawar Murder Case | 'त्या' कीर्तनकाराच्या हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद; कोण आहेत सशस्त्र मारेकरी?

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती 

वैजापूर: डोक्यात दगड घालून एका ५० वर्षीय महिला कीर्तनकाराची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वैजापूर-गंगापूर महामार्गावरील तालुक्यातील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात घडली होती. या महिलेच्या डोक्यात दोन दगड घालून निर्घृणपणे हा खून करण्यात आला होता. दरम्यान या हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात दोघेजण सशस्त्र असून चॅनल गेट तोडीत असल्याचे दिसत आहे.

ह.भ.प. संगीता पवार (वय ५० रा. चिंचडगाव) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान २८ जून रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: ग्रामसेवकास मारहाण भोवली; दोघांना सश्रम कारावास

परंतु पोलिसांचा तपास अजूनही पूर्णत्वाकडे गेलेला नाही. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे पोलिसांचा संथगतीने सुरू असलेला तपास पूर्ण होऊन आरोपी केव्हा गजाआड होणार? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आतापर्यंत पोलिसांच्या हाती फक्त सीसीटीव्ही फुटेज आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा मारेकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार? हा गहन प्रश्न आहे.

हेही वाचा: अखेर 'त्या' पतसंस्थेच्या संचालकांविरुध्द गुन्हा; ठेवीदारांना पावणेसहा कोटींचा गंडा

 सुरवातीला जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे कयास बांधले जात होते. तसा आरोप पवार यांच्या निकटवर्तीयांनी केला होता. 

मृत संगीता पवार 

परंतु पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने आलेल्या सशस्त्र चोरट्यांनीच हा खून केला. या निष्कर्षाप्रत पोलिस यंत्रणा पोहोचली होती. त्यामुळे या सशस्त्र चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा पछाडत आहे. परंतु यंत्रणेला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अद्याप यश मिळालेले नाही.

काय झाले सीसीटीव्हीत कैद?

दरम्यान चिंचडगाव येथील आश्रमात दोन चोरटे प्रवेश करून प्रथम चॅनल गेट तोडण्याचा प्रयत्न करतात. दोघेही साधारणतः पंचविशीच्या आतील असून यातील एकाने तोंडाला रुमाल बांधलेला आहे.