Hot Posts

6/recent/ticker-posts

ladki Bahin Yojana | फेब्रुवारीचा पडला, मार्चचा हप्ता कधी? लाडक्या बहिणींचा सवाल; काय म्हणाल्या महिला व बालविकास मंत्री?

अद्याप चित्र स्पष्ट नाही 

मुंबई: राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे ( Women and Child Development Minister Aditi Tatkare)  यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता (Installment ) ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाच्या (International Women's day) निमित्ताने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर केले होते. जागतिक महिला दिनी जमा झालेला १५०० रुपयांचा हा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा आहे. मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणून, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याची माहिती मिळाल्यावरच स्पष्ट होईल.असे त्या म्हणाल्या.