Hot Posts

6/recent/ticker-posts

Anti-Corruption Department | लाचखोर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळूचे वाहन सोडविण्यासाठी घेतली लाच

 तहसीलदारांसह तिघांवर कारवाई


 अवैधरित्या वाळू विक्री करणारी दोन वाहने सोडण्यासाठी लाच मागताना पैठणचा तहसीलदार सारंग चव्हाण याला खासगी पंटर सलील शेख व तहसील कार्यालयातील महसूल सहायक हरीश शिंदे यांना लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

गेल्याच महिन्यात पैठण महसूल व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत गोदावरी नदीतून अवैद्य वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले होते. तहसील कार्यालयात जप्त असलेले  दोन्हीही वाळूचे हायवा सोडून देण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी खाजगी इसम सलील शेख व लोकसेवक हरीश शिंदे यांच्यामार्फत हायवा मालकास एक लाख दहा हजार रुपयाची मागणी केली होती. त्यासोबतच दोन्ही हायवांमध्ये असलेली वाळूची किंमत म्हणून पुन्हा तीस हजार रुपये वस्तू स्वरूपात मागणी केल्याने फिर्यादीने तहसीलदार सारंग चव्हाण, लोकसेवक हरीश शिंदे व खाजगी इसम सलील शेख यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.


या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपता विभागाने ४ मार्च रोजी पैठण तालुक्यातील हिरडपुरी या गावात खासगी इसम सलील शेख याला फिर्यादीकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. फिर्यादीचे वाहने सोडून देण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी बनविलेला प्रस्ताव सलील शेख हा स्वतः हातात घेऊन तहसीलदाराच्या गाडीत बसून फिरत होता. प्रस्ताव ओके आहे की नाही. असे व्हाॅट्सअॅपवरून सलील शेख याने तहसीलदार यांना विचारले देखील होते. या सर्व पुराव्यावरून तहसीलदार सारंग चव्हाण, हारिश शिंदे, सलील शेख यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.