Hot Posts

6/recent/ticker-posts

Wedding preparations | लग्नाची जय्यत तयारी झाली.. घटिका समीप आली..तोच पोहोचला पोलिसांचा ताफा ! काय आहे प्रकरण?

बाभुळगाव ( बु.) परिसरात बालविवाह रोखला 

 

 गावातील मंदिरात लग्नाची तयारी झाली..लग्नघटीकाही समीप आली.. काही वेळातच लग्न लागणार तोच   आणि अचानक पोलिसांचा फौजफाटा लग्नस्थळी दाखल झाला. पोलिसांना पाहताच अख्ख्या वऱ्हाडींचीच पाचावर धारण बसली. कारण होते अल्पवयीन वधूचे. वैजापूर पोलिसांनी सतर्कता दाखवून अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह रोखला. केवळ हा विवाहाच रोखला नाही तर आईवडिलांसह नातलगांचे समुपदेशनही करण्यात आले.

हेही वाचा: सेवानिवृत्त ग्रेडरला लाखोंना गंडविले!

   त्याचे झाले असे की, तालुक्यातील बाभुळगाव ( बु.) येथील एका मंदिरात दुपारी विवाह सोहळा होता. या पार्श्वभूमीवर वधूकडील मंडळीनी जय्यत तयारी केली होती. वऱ्हाडी मंडळी ही आली. नवरदेवासह सर्वच सज्ज झाले होते. काही वेळातच लग्नसोहळा पार पडणार होता. परंतु या परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् काही वेळातच  पोलिसांचा ताफा लग्नस्थळी  दाखल झाला आणि या सोहळ्याला ब्रेक लागला.

हेही वाचा: 'ते' चौघे होते गाढ झोपेत; अंगावर लोखंड पडलं अन् सर्वच संपलं!

 वधू  अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी हा बालविवाह वेळीच रोखून सतर्कतेचे दर्शन घडविले. तालुक्यातील भिवगाव येथील रहिवासी असलेल्या वराचा विवाह गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी होणार होता. 

हेही वाचा: 'त्याने' पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह ठोकली धूम!

परंतु बाभुळगाव (बु.)परिसरात पार पडणाऱ्या विवाहसोहळ्यातील वधू ही अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी लग्नस्थळी जाऊन मुला -  मुलीच्या वडीलांना भेटून दोघेही अल्पवयीन असल्यामुळे हा बालविवाह असून कायदेशीर तो गुन्हा असल्याचे सांगितले. 

अज्ञान की बौद्धिक दारिद्रय?

 दरम्यान सध्याचे मोबाईल, संगणक युग आहे. अशी चर्चासत्र कितीही झडत असली तरी काही पारंपरिक बाबींना मात्र तिलांजली बसायला तयार नाही. शहरीकरण, औद्योगीकरण, जागतिकीकरण वाढले. शहरे व खेडी पुढारली. परंतु खेड्यातील माणसांची पारंपरिक  व बुरसटलेली मानसिकता बदलायला तयार नाही. आजही खेड्यात सर्रासपणे अल्पवयीन मुला - मुलीचे विवाह मोठ्या थाटामाटात लावली जातात.  हे अज्ञान म्हणावं की बौध्दिक दारिद्र्य? हे एक न उलगडलेलं कोडंच म्हणावं लागेल.

महिला व बालकल्याण विभागाला माहिती 

 वैजापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी किरण गोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलिस पाटील व ग्रामसेवकांनी हा विवाह रोखून नातेवाइकांकडून बालविवाह करणार नाही, असे बंधपत्र लिहून घेतले. हा बालविवाह बाभुळगाव बुद्रुक हद्दीत होत असल्याने तेथील सरपंच अण्णासाहेब गायकवाड व ग्रामविकास अधिकारी रेश्मा बागुल यांना घटनास्थळी बोलावून माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयालादेखील याबाबत माहिती देण्यात आली.