Hot Posts

6/recent/ticker-posts

Accident | 'ते' दोघे विद्युतपंप घेऊन जात होते; कारने धडक दिली अन् सर्वच संपलं!

महालगाव शिवारातील घटना 

भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण ठार झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वैजापूर - गंगापूर राज्य मार्गावरील तालुक्यातील महालगाव  शिवारात घडली.


 भानुदास शिवाजी दुशिंग (२८), करण दत्तू काळे (२१) दोघे रा. जातेगाव ता. वैजापूर अशी मृतांची नावे आहेत. या अपघातासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार भानुदास व करण दोघे तरुण हे गंगापूर रस्त्याने दुचाकीवरून जात असताना महालगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. या घटनेत दोघेही तरुण जागीच ठार झाले. असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

हेही वाचा: 'शेअर बाजारा'तून गंडविण्याचा अनोखा 'गोरखधंदा'

अपघातानंतर  बाजार समितीचे संचालक प्रवीण पवार, संजय आव्हाड व अन्य नागरिकांनी तातडीने दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 

हेही वाचा: 'फोडा आणि राज्य करा'; दुभाजकाची तोडफोड!

'पंचगंगा'जवळ  घडली घटना 

दरम्यान दोघे तरुण विद्युतपंप घेऊन जात असताना पंचगंगा साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. अपघातात एवढा भीषण होता की, दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांच्या खिशातील विद्युतपंपाच्या बिलावर असलेल्या नावामुळे त्यांची नावे समोर आली.