Hot Posts

6/recent/ticker-posts

Crime News | सराफा कारागिराचे घर फोडले; कुठं घडली घटना?

 ४.७७ लाखांचा ऐवज लंपास 

वैजापूर: अज्ञात चोरट्यांनी सोनार कारागिराचे घर फोडत रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने असा ४ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील मुळे गल्ली परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या प्रकरणात वैजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र प्रभाकर बनसोडे (वय ५२ वर्षे रा. मुळे गल्ली वैजापूर ) यांनी  फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घरीच कुलस्वामिनी ज्वेलर्स नावाने दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ९ जुलैपासून ते कुटुंबीयांसह आपल्या मुलीकडेकडे होते.१७ जुलै रोजी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरातील कुलस्वामिनी ज्वेलर्स दुकानातील काउंटरवरील सामान अस्तव्यस्त पडलेले होते. घरात पाहणी केली असता घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली २ लाख ७ हजारांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, एस. बी. जोग, डी. व्ही.लोंढे,चालक एन. के. करळकर, परमेश्वर आठे, प्रियंका गायकवाड, सचिन तबडे यांनी पाहणी केली.